मराठी सोशल मिडिया डिझाईन्स तसेच व्हिडिओ ॲप

दि जाहिरातवाला

व्यवसाय असो वा राजकारण
जो दिसतो तोच टिकतो..

मराठी डिझाइन्स / व्हिडिओ

अनलिमिटेड मराठी दिनविशेष, सुविचार, वाढदिवस, जनजागृती पोस्ट आणि महत्वाच्या सणांचे व्हिडिओ उपलब्ध

 

स्पेशल फ्रेम सुविधा

तुम्हाला तुमच्या फोटो, नाव, पदासह आकर्षक स्पेशल फ्रेम डिझाईन करून अ‍ॅपमध्ये सेट करून दिली जाते.

व्यवसाय कॅटेगरी

100 पेक्षा जास्त व्यवसाय संबंधित रेडीमेड पोस्ट जाहिरातीसाठी उपलब्ध

सहज डाउनलोड

तुम्ही तुमचे पोस्ट अथवा व्हिडिओ निवडला की, तो त्वरित डाउनलोडसाठी उपलब्ध होतो

मिनी वेबसाइट

app द्वारे अगदी सोप्या पद्धतीने तुमची राजकीय अथवा व्यवसायिक मिनी वेबसाइट देखील बनवू शकता.

सोपा इंटरफेस

वापरण्यास अगदी सहज आणि सोपे

माफक दरात पॅकेज

तुम्हाला अनुकूल प्लॅन आपण निवडू शकता

ग्राहक सहाय्यता

अ‍ॅप संदर्भात काही अडचण आल्यास आमचे ग्राहक सेवा प्रतिनिधी आपल्या सेवेसाठी स.9.00 ते सायं.07.00 या वेळेत उपलब्ध असतात

राजकीय डेमो

व्यवसाय डेमो

Influencer Corner

दि जाहिरातवाला

महाराष्ट्राचे आपल्या हक्काचं

सोशल मीडिया

डिझाईन अ‍ॅप

तुमचा पक्ष कोणताही असो आपल्या पक्ष प्रचारासाठी जाहिरात ही आमचीच

The Jahiratwala

दि जाहिरातवाला

The Jahiratwala

महाराष्ट्राचे आपल्या हक्काचं

सोशल मीडिया

डिझाईन अ‍ॅप

तुमचा पक्ष कोणताही
असो आपल्या पक्ष प्रचारासाठी जाहिरात ही आमचीच

ग्राहकांचे अभिप्राय

माया गाडेकर

शाम गाडेकर

संघर्षातून उभा राहिलेला ‘दि जाहिरातवाला’ चा यशस्वी प्रवास

जिद्द, मेहनत आणि नव्या स्वप्नांवर विश्वास ठेवत, माया आणि श्याम गाडेकर यांनी ‘दि जाहिरातवाला’ या अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल जाहिरात क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवली आहे. आर्थिक अडचणींवर मात करत, दोघांनी मिळून या यशस्वी प्रवासाची सुरुवात केली.  देशभरात जेव्हा कोरोना महामारीचा उद्रेक झाला.त्या काळात श्याम गाडेकर यांना नोकरी सोडावी लागली आणि आणि तेव्हा नुकतेच लग्न झालेल्या गाडेकर दाम्पत्यावर आर्थिक संकट ओढावले. मात्र परिस्थितीवर शोक न करता, त्यांनी मार्ग शोधायचा ठरवला. नोकरी शोधण्यासाठी पुण्याला जायचे ठरले मात्र अगदी गाडी भाडे द्यायला ही पैसे नव्हते , कसेबसे पैसे जुळवून या  संकटाच्या काळात, माया आणि श्याम यांनी एकत्र येऊन रांजणगांव MIDC मध्ये मजुरीचे काम स्वीकारले. 12 तास उभे राहून दिवसभर श्रम पण मनात अनेक स्वप्न — यामध्ये ते दोघे गुंतले होते. माया यांनी स्वत:च्या साचवलेल्या थोड्याशा पैशातून एक छोटा संगणक (कॉम्प्युटर) खरेदी केला, कारण तिच्या मनात ठाम विश्वास होता की शिक्षण आणि कौशल्यच माणसाला पुढे नेऊ शकते. श्याम गाडेकर यांना डिजिटल मार्केटिंगची आवड होती. मायाने त्याला प्रोत्साहन दिलं आणि दोघांनी मिळून यामध्ये भविष्य शोधण्याचा निर्धार केला. नव्या स्किल्स शिकण्यासाठी त्यांनी एकमेकांना साथ दिली — सोशल मीडिया मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग यांसारख्या कौशल्यांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं.
छोट्या छोट्या प्रोजेक्ट्ससाठी जाहिराती तयार करताना त्यांनी ‘दि जाहिरातवाला’ या प्लॅटफॉर्मची संकल्पना उभी केली.
छोट्या मराठी व्यवसायिकांना, राजकीय नेत्यांना आणि विविध संस्थांना कमी खर्चात प्रभावी सोशल मीडिया डिझाईन्स उपलब्ध करून देणं, हे या अ‍ॅपचं ध्येय ठरलं.
आज, ‘दि जाहिरातवाला’ अ‍ॅपच्या माध्यमातून हजारो व्यवसायिक, राजकीय नेते आणि उद्योजक आपल्या जाहिराती सुलभपणे तयार करून आपले काम लोकांपर्यंत पोहचवत आहे .आणि या अ‍ॅपच्या मार्फत आज अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांना यश आले आहे .
पण ही कहाणी इथे संपत नाही. आज जरी गाडेकर दाम्पत्य यशाच्या पायावर चढत असलं, तरी त्यांची झगडण्याची वृत्ती तशीच आहे. अजूनही अनेक स्वप्न त्यांच्या डोळ्यात आहेत — नव्या सेवा सुरू करायच्या आहेत, ‘दि जाहिरातवाला’ ला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचं ध्येय आहे, आणि मराठी माणसाला डिजिटल युगात स्वावलंबी बनवण्याचा संकल्प आहे.

आजच
The Jahiratwala Download करा

मराठी सोशल मीडिया डिझाईन्स तसेच व्हिडिओ अ‍ॅप

The jahiratwala is a Social Media Branding Solution, This enables you to generate and share the best social media visual content with your customers, team, audience, and network with your branding.

Follow Us On